Small Story | आटा

Small Story

"आटा " ......"पीठ
तुम्ही विचार करत असाल ना, आता ह्या पिठाची काय स्टोरी, अहो खुप मोठी स्टोरी आहे. कशी माहीत आहे का, तर बघा आपण सिरियल, पिक्चर मध्ये बघतो की, बायको पीठ मळत असते आणि मधेच ते पीठ तिच्या गालावर किंवा केसाला लागत . आणि तिचा नवरा प्रेमाने😘 तिच्याकडे बघतो. आणि हळुच हलक्या हाताने किती प्रेमाने तो ते पीठ पुसत असतो हो ना?...
नाहीतर आपले नवरे ,बघा एखाद्या दिवशी आपण स्वयंपाक बनवत आहे, आणि आपल्या हातून पीठाचा डब्बा खाली पडलेला असतो,आणि नवरा निवांत एका हातात फोन 📱आणि एका हातात टिव्ही रिमोट असतो.आणि हाॅल मधुनच ओरडतो अग काय झाल काय पाडलस, तरी कायम सांगतो लक्ष देवुन काम करत जा पण नाही सारख धडपडायच बघीतल टिव्ही च्या हिरो मधे आणि घरातल्या हिरो मध्ये काय फरक असतो. आपला नवरा हाॅल मधुन ओरडेल पण आत येऊन बघत नाही, डब्बा पडला की,बायको पडलीय ते, .
किमान येऊन गालावरच पीठ पुसायच राहिले पण बायको पडली असेल तर तिला किमान हात देऊन ऊठायला तर मददत करा. टिव्ही च पीठ प्रेम बघण्याच्या नादात किचन भर पीठ झाले, ते तर नवरा नाही आपल्याला साफ कराव लागणार .पण प्रेम तर,टिव्हीच नाही तर आपल्या नवर्याच आहेच आपल्यावर, किमान दया येऊन हात तर द्यायला येईल, नाहीतर टिव्ही प्रेम फक्त बघायला चांगल ,सत्य काहीच नसते.

Chhatrapati Shivaji Maharaj | छञपती शिवाजी महाराज

chhatrapati shivaji maharaj 


"छञपती शिवाजी महाराज "
सर्व प्रथम सर्वांना शिवजयंती च्या खुप शुभेच्छा
 जय भवानी जय शिवाजी 
आपल्या सगळ्यांच्या मनातील अगदी लहानांपासून ते मोठ्या पर्यंत च्या सर्वाचे प्रेरणास्थान म्हणजे "छञपती शिवाजी महाराज "तुम्ही जाता -जाता लहान मुलांना विचारल ना महाराजांच्या विषयी तरी तो सांगेल की, छञपती शिवाजी महाराज च्या कितीतरी यशोगाथा आजच्या पिढीला सुध्दा माहीत आहे .अशा आपल्या छञपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर झाला. वयाच्या 15...16 वर्षा पासुन त्यानी मावळयाचे संघठन करून आजूबाजूच्या किल्ल्यावर हल्ले करुन एक-एक किल्ले काबिज केले.
छञपती शिवाजी महाराजांचे साहसी चरित्र आणि नैतिक बल सगळ्यांना माहीत आहे. आपल्या वीरता आणि पराक्रमाने मुघलांना आपल्या समोर गुडघे ठेकायल भाग पाडणारे साहस,कुटनिती ,बुध्दीमता, कुशल राजा आणि एक महान योध्द याच्या रुपामध्ये संपुर्ण भारत ओळखतो .छञपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व म्हणजे अनेक सदगुणांचा समुचय होय. स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा, स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी, शञुला निधड्या छातीने भिडण्याचे धैर्य युध्द जिंकण्यासाठी प्रभावी डावपेच आखण्याची कुशाग्र बुध्दीमता, युध्दकौशलय प्रजेविषयी वात्सल्य, यश मिळवुन देणारी निर्णयक्षमता असणारे,
अशा असंख्य वैशिष्ट्यांनी त्याचे चरित्र हा भारतीय लोकांच्या दृष्टीने युगानुयुगे लाभलेला प्रेरणास्रोत आहे.
तर,आजच्या काळात लहानपणापासून मुलांन मध्ये हा गुण रुजवणे महत्वाचे आहे.
" राजमाता जिजाबाई "नी छञपती शिवाजी महाराज घडवले. तसेच आताच्या काळात आपल्या घराघरात एखादा तरी छञपती शिवाजी महाराज जन्माला यावा.आणि त्याना घडविण्यासाठी जिजाऊ ही असावी.
"जय भवानी जय शिवाजी "

shivaji maharaj story,shivaji maharaj death,shivaji maharaj jayanti,shivaji maharaj family tree,shivaji maharaj photo,chhatrapati shivaji maharaj spouse,shivaji maharaj information,shivaji maharaj song

Friends मैञीणी

BEST FRIENDS | मैञीणी

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"मैञीणी"
मैञीणी, हा शब्द ऐकला छान वाटतो, तसच ते मैत्रीच नात ही असत.अगदी खट्याळ,नटकट आणि तितकेच स्वच्छ प्रेमळ हो ना.
काल खुप दिवसांनी काय खुप वर्षानी एका मैञीणीचा फोन आला. कधी शाळा, कॉलेज मध्ये भेटलेलो आम्ही, तेव्हा पासुन ते आता पर्यंत कधी बोलण, भेटन नाहीच ऐवढया वर्षातून तिने नंबर घेऊन काॅल केला. खुप आनंद झाला. अगदी शाळा, कॉलेज चे दिवस पुन्हा डोळ्यासमोर आले. ज्या मैञीणी रोज भेटत होतो. त्याचा आवाज ऐकला तरी तो ओळखला ही नाही. किती फरक होतो ना शालेय जीवनानंतर लग्न, मुले, संसार या मध्येच असतो. आणि ऐक आमच्यातील काही जणी मध्ये ऐवढा फरक दिसतोय की, ओळखणे ही मुश्किल झाले. आम्ही ऐकमेकींचे फोटो बघीतले😜😅 किती फरक दिसण्यात, बोलण्यात .
खरंच ऐवढा फरक होतो का,लहानपणी एकञ खेळलो, मज्जा केली त्याना या संसारात बडून सगळे विसरुन गेलो .मस्त असत ना मैञीणी बरोबर खेळणे, खाणे,गप्पा मारणे. जर मैञीणी बोलत बसल्या तर टाईम सुध्दा कळत नाही. ऐवढया बोलण्यात गुंग असतात. असतच हे नाते अस थोड प्रेम, कधी रागावणे तर कधी जीवाला जीव लावणे.
मी तर,म्हणेन की,मैत्रीणी आटवा त्याना भेटा आणि पुन्हा ते जुने दिवस जगा. सुख:दुख तर प्रत्येकाला आहेत ते कधी कमी नाही होणार, म्हणून कधीतरी आपल्या मैञीणीना भेटा मस्त ऐनजाॅय करा. बघा ना कालच्या ऐका फोन मुळे किती तरी आठवणी जाग्या झाल्या.लहानपण आणि शालेयजीवन पुन्हा एकदा समोर आले .
मग कधी बोलवताय तुम्ही तुमच्या मैञीणीना, 🙂"जीवन सुंदर आहे "आनंदी रहा.


best friends forever quotes,best friendship quotes,short best friend quotes,cute best friend quotes,best friends quotes that make you cry,funny best friend quotes,best friend quotes for girls,friendship quotes and sayings

"महिला दिवस " वा! किती मज्जा ना 8 मार्च महिला दिवस म्हणून साजरा करतात. 🙂बघा ना मी आज काही काम नाही करणार, माझ्या साठी वेळ काढणार, मस्त फिरणार, शाॅपिंगला, हाॅटेलला जाणार माझ्या मना सारख करणार, . बघा ना आज फोन, टिव्ही,सोशल मीडियावर सगळीकडे आज महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. 🙂किती छान वाटतय ना. आज महिलांसाठी काहीतरी वेगळ आहे वाटतय. ऑफिस मध्ये सुद्धा महिला दिवस साजरा करतात. आणि खूप सार्‍या शुभेच्छा ही देतात. आजचा दिवस खास करण्यासाठी शाळा, कॉलेज मध्ये ही कार्यक्रम आयोजित केले जातात. आजचा 8 मार्च हा दिवस फक्त माझ्यासाठी,आणि बाकीचे 364 दिवस माझ्या घरचे आणि इतरांसाठी. बघा ना,असा दिवस रोज आपल्याला जगता आला तर,आणि ह्या शुभेच्छा ही रोज मिळाल्या तर🙂 🌹🌹महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹 जीवन सुंदर आहे